Maharshtra Marathi News Nanded Marathi News

10 एप्रिलपासून खालील बाबींना असेल परवानगी

                                       10 एप्रिलपासून खालील बाबींना असेल परवानगी

 

नांदेड, (जिमाका) दि. 10 :- आपत्ती विरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गंत दि. 5 व 6 एप्रिल च्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यात 5 एप्रिलपासून सायंकाळी 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी आदेश लागू करण्यात आले. यांची मुदत 30 एप्रिल च्या रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामध्ये राज्य शासनाच्या 9 एप्रिलच्या आदेशान्वये कोविड-19 विषाणुच्या संक्रमन खंडीत करण्याच्या जागेवर पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच यापुर्वीच्या आदेशात नमूद करण्यात आलेल्या प्रतिबंधित /बंद क्षेत्र व सूट/ वगळण्यात आलेले क्षेत्र कायम ठेवण्यात आलेले आहेत.

 

आरटीपीसीआर चाचणी आयोजित करण्याच्या संदर्भात सार्वजनिक परिवहन/खाजगी वाहतूक/चित्रपट, मालिका, जाहिराती, घरपोच सेवेशी संबंधित कर्मचारी,परीक्षा घेणारे कर्मचारी , लग्नाच्या ठिकाणी कर्मचारी, यासह विविध क्षेत्राकरिता लसीकरण न करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी 15 दिवसांची मुदत आहे. अंत्यसंस्कार स्थळावर, खाण्यायोग्य विक्रेते, कामगार/उत्पादन क्षेत्रातील कर्मचारी, ई-कॉमर्स कर्मचारी, परवानगी असलेल्या बांधकाम कार्यात सहभागी कर्मचारी, आरबीआय आणि आरटीपीसीआर चाचणी आवश्यक असणाऱ्या आदेशात नमूद केलेल्या इतर कोणत्याही क्षेत्रात आरटीपीसीआर चाचणीला एक पर्याय म्हणून रॅपीड ॲटीजन टेस्टला परवानगी दिली जात आहे. हे आदेश 10 एप्रिल पासून अंमलात येतील. आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र, सेतु केंद्र, पासपोर्ट सेवा केंद्र इत्यादी जे शासकीय सेवेसाठी एक खिडकी योजना अंतर्गत सेवा पुरवितात ते केंद्र सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील.

 

वर्तमानपत्राच्या संज्ञेमध्ये मासिके, जर्नल्स आणि नियतकालिके यांचा समावेश राहील. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र ठरतील असे जिल्हादंडाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

0000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: