Maharshtra News Nanded News

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी दुय्यम निबंधक कार्यालयातील ऑनलाईन सेवांचा वापर करावा

 

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी

दुय्यम निबंधक कार्यालयातील ऑनलाईन सेवांचा वापर करावा

 

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- सध्या सर्वत्र कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढलेला आहे. यासाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागिाकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व दस्त नोंदणीच्या सोईसाठी विभागात काही सेवा ऑनलाईन उपलब्ध केल्या आहेत. या सेवांचा नागरीकांनी वापर करुन दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करावी. तसेच पुढीलप्रमाणे सेवा सुविधांचा वापर अनिवार्य केला असून त्याचा वापर करुन दस्त नोंदणीबाबत सहकार्य करावे असे, आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी वि.प्र. बोराळकर यांनी केले आहे.

 

नागरीकांनी या विभागाच्या संकेतस्थळावर असलेल्या दस्त नोंदणी करीता PDE द्वारे डाटा एंट्री करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एट्री किंवा दुरुस्त्या पुर्णपणे थांबविण्यात येत आहेत. नागरीकांनी या PDE डाटा एंट्री करुन दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या वेबसाईट वर इस्टेप इन या प्रणालीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली सोईची वेळ ऑनलाईन आगाऊ बुक करुन किंवा कार्यालयात दुरध्वनीवर समक्ष संपर्क साधुन वेळ आरक्षित केली नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी. नागरिकांनी दस्ताचे निष्पादन घरी किंवा कार्यालयाच्या बाहेरच करावे. प्रत्येक व्यक्तीने सह्यासाठी स्वत:चे पेन आणावा. एकच पेन एकमेकात सह्यासाठी वापरु नये. आरक्षित वेळेलाच कार्यालयात हजर रहावे. मास्क लावल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही यांची नोंद घ्यावी. विभागाच्या वेबसाईट वर लिव्ह ॲड लायसन ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह अँड लायसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी (फिजीकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेशापर्यत थांबवण्यात येत आहे. सद्यस्थितीत दस्त नोंदणीसाठी मोठया शहरात म्हणजेच जिल्ह्याचे ठिकाणी व तालुक्याचे ठिकाणी सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात 9.45 ते 6.15 या वेळेत सुरु राहील. जिल्ह्यातील सर्व कार्यालयाचे कामकाज शनिवार, रविवार व शासकीय सुटी वगळता सोमवार ते शुक्रवार पाच दिवस नियमित सुरु राहतील. यांची नागरीकांनी नोंद घ्यावी असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: