
परभणी, दि.6 (जिमाका) :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि.7 एप्रिल 2021 पासून शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती चाचणीची कामे विहीत क्षमतेपेक्षा 25 टक्के इतक्या संख्येने नियमितपणे सुरु राहतील. तसेच इतर कार्यालयीन कामकाज 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीप्रमाणे करण्यात येईल. तरी अर्जदारांनी नोंद घेवून कार्यालयास सहकार्य करावे. असे आवाहन परभणीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी केले आहे.
योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज नेहमीप्रमाणे मौजे असोला येथे गर्दी न करता चालू राहणार आहे. केंद्र शासनाने वाहन विषयक, अनुज्ञप्ती विषयक कागदपत्रांची वैधता दि.30 जून 2021 पर्यंत वाढविलेली आहे. याची सर्वांनी नोंद घेवून विनाकारण कार्यालयात गर्दी करु नये. अर्जदारांनी प्रत्येक कामाकरिता घेतलेल्या अपॉईंटमेंटच्या निर्धारित वेळेत मास्क, हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझर इत्यादीसह उपस्थित रहावे. सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच शासन आदेशाप्रमाणे अभ्यांगतांना कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष भेटण्याची परवानगी देण्यात येणार नाही. आपल्या कोणत्याही कामासाठी, चौकशीसाठी mh22@mahatranscom.com dyrto.22-mh@gov.in यावर संपर्क करावा. असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-
