Nanded Marathi News

नांदेड:आवश्यक वस्तु सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा 30  एप्रिलपर्यंत बंद राहतील

नांदेड, (जिमाका) दि. 5 :- जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग थोपविण्‍यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे यापुर्वी काढलेल्या आदेशात बदल करुन आता जिल्ह्यात संपूर्ण ठिकाणी राज्य शासनाने 30 एप्रिल, 2021 अखेरपर्यंत लागू केलेले निर्बंध असतील. या आदेशाची आज दिनांक 5 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत अंमलबजावणी केली जाईल.

रात्री 8 वाजतापासून ते सकाळी 7 वाजतापर्यंत रात्रीची संचारबंदी तर सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्‍यात आले आहेत. रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील. किरणा, औषधी, भाजीपाला आदि जीवनावश्यक व आवश्यक वस्तु सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा दि. 30 एप्रिल 2021 बंद राहतील.

*अत्यावश्यक सेवेमधील खालील बाबींचा समावेश असून याच संस्थां असतील सुरु*
1) रुग्णालय, रोग निदान केंद्र, क्लिनिक्स, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा.
2) किराणा सामान दुकाने, भाजीपाली दुकाने, दुध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने.
3) सार्वजनिक वाहतुक व्यवस्था जसे की, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बसेस.
4) विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा.
5) स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व सेवा.
6) स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा.
7) मालाची / वस्तुंची वाहतुक.
8) शेतीसंबधित सेवा.
9) ई कॉमर्स.
10) मान्यताप्राप्त वृत्तपत्र आणि त्यांच्याशी संबंधित सेवा.
11) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवा.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: