National News

अर्धापूर येथील युवकांचा सतर्कतेमुळे आगी चे अनर्थ टळले.

अर्धापूर येथील युवकांचा सतर्कतेमुळे आगीचे अनर्थ टळले.

अर्धापूर ( शेख जुबेर )

अर्धापूर शहराच्या पश्चिमेस जुन्या आगापुरा वस्ती लगत शेत जमीन आहे. वस्ती व शेतीच्या दरम्यान गच्च झाडे झुडपे असून या झाडाझुडपांना शुक्रवार दिनांक १२ रोजी साडे अकराच्या दरम्यान अचानकपणे आग लागली. उन्हाची तीव्रता व अचानक पणे लागलेली आगीमुळे परिसरात खळबळ उडाली परंतु येथील स्थानिक युवकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता आग विझवली नसता ही आग जवळच्या परिसरासाठी घातक ठरली असती. शेख यासेर, शेख शहराज, रसूलखान, शेख सुमेर व इतर युवकांच्या सतर्कतेमुळे आगिची मोठी हानी टळली.
घटनास्थळी अर्धापूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी मारोतराव जगताप, माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक मिर्झा पप्पू बेग, नगरसेवक प्रतिनिधी अफसर सिद्दिकी यांनी पाहणी केली व धाडसी तरुणांचे कौतुक करून सत्कार केला. यावेळी युवक काँग्रेसचे मिर्झा अबुझर बेग व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: