National News

अर्धापूरात ट्रक-मोटर सायकलचा अपघात, एक जण गंभीर जखमी.

अर्धापूरात ट्रक-मोटर सायकलचा अपघात, एक जण गंभीर जखमी.

देवदूता प्रमाणे पोलीस निरीक्षक अरूण केंद्रे मदतीला धावले

अर्धापूर ( शेख जुबेर ) वसमत फाटा महामार्ग पोलीस चौकीच्या चौकात ट्रक – मोटर सायकलचा समोरासमोर भिषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. त्या जखमी व्यक्तीला पोलीस निरीक्षक अरूण केंद्रे यांनी स्वता:हा उचलून महामार्गाच्या रूग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल केले.

नांदेड हून नागपूर कडे जाणारा ट्रक क्रमांक आर.जे.11 जी.बी.2127 ह्या ट्रकने मोटारसायकल क्रमांक एम.एच.26 बी.एस.4175 ला जोराची धडक दिली.त्या धडकेत मोटारसायकल स्वार माधव नरसिंहराव चिकारकर (वय -42) रा.पांडूरंग नगर,नांदेड हे गंभीर जखमी झाले.

गंभीर जखमी झालेल्या माधव चिकारकर यांना महामार्ग पोलीस निरीक्षक अरूण केंद्रे यांनी स्वता:हा उचलून महामार्गाच्या रूग्णवाहिकेतून दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल केले.त्यांना सहकार्य पोलीस हवालदार वामन कोकाटे,शेख एकबाल,ज्ञानेश्वर तिडके,गजानन कदम,माणिक पेठे,अंकुश वडजे,अविनाश धुमाळ,सुनिल पावडे,दत्ता डुकरे, शिपाई वसंत सिनगारे यांनी केले.

चौकट घेणे.
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याप्रमाणे खाकी वर्दीतील पोलीस नेहमीच मदतीसाठी तत्पर असतात.त्याचा प्रत्यय आज आला.एखाद्या देवदूता प्रमाणे पोलीस निरीक्षक अरूण केंद्रे जखमी व्यक्तीच्या मदतीला धावले.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: