Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

समाज कल्याणच्या विविध योजनेसाठी अर्ज करावेत

 

            परभणी, दि.8 :- भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा, राजर्षि शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनेकरीता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक दि.15 मार्च 2021 आहे. तरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन भरुन हार्ड कॉपी महाविद्यालयात जमा करावी. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.

            तसेच ज्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड मॅपरद्वारे बँकेशी लिंक झालेले नाहीत अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी 2018-19 व 2019-2020 या वर्षातील शिष्यवृत्तीची रक्कम अद्याप त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेली नाही त्यांनी आपले आधार मॅपरद्वारे बँकेशी लिंक करुन घ्यावे व आपली महाडिबीटीची प्रोफाईल अद्यावत करावी. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: