Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

बेरोजगारांसाठी 15 व 16 मार्चला ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन

 

          

परभणी, (जिमाका) दि. 5 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरीता तसेच स्थलांतरीत म्हणजेचे परराज्यातून, जिल्ह्यातून परत आलेल्या मजूर कामगारांना रोजगारांची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकमा मार्गदर्शन केंद्राच्यावतीने दि.15 व 16 मार्च 2021 रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी याकरीता ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी महास्वयंम या संकेतस्थळावर ऑनलाईन ॲप्लाय करुन संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र.02442-220074 किंवा भ्रमणध्वनी क्र. 9881524643 यावर संपर्क साधावा. असे सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, परभणी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: