Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

परभणी:१६ मार्चपूर्वी कोरोना चाचणी करून घेण्याचे सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांचे निर्देश

परभणी, दि.8 :- कोरोना रुग्णांची मागील काही दिवसापासून संख्या वाढत असून जिल्हयातील सर्व कार्यालय प्रमुखाने आपल्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांची 16 मार्च पूर्वी आर. टी. पी. सी. आर. चाचणी करुन घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात सर्व शासकीय यंत्रणा यांची आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, महानगर पालिका आयुक्त देविदास पवार, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन डॉ. संजय कुंडेटकर, महानगर पालिका आरोग्य अधिकारी डॉ. कल्पाना सावंत उपस्थित होते.

माझे कार्यालय सुंदर कार्यालय या उपक्रमाद्वारे सर्व विभागांनी आपले कार्यालय व कार्यालयीन परिसर स्वच्छ करावेत. तसेच कार्यालयातील अभिलेखाची वर्गवारी करून कार्यालयीन कामकाजाला गती दिली पाहिजे. माझे गांव सुंदर गाव यामध्ये ग्रामस्वच्छता दुताची नियुक्ती करुन यामध्ये सर्व विभागाने सहभागी होण्याबाबत जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सुचना केल्या.

जिल्ह्यातील बांबू लागवड योजनेचा आढावा घेत कृषी विभागांनी बाबु लागवड करण्यासाठी योग्य नियोजन करावे असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.यावेळी अधीक्षक अभियंता प्रविण अन्नछत्रे यांनी जिल्हात १ मार्च २०२२ ते १४ एप्रिल २०२१ दरम्यान महाकृषी उर्जा अभियान- कृषी उर्जा पर्व सुरु असून नविन वीजजोडणी, पाहिजे तेव्हा सौर कृषी वाहिनीद्वारे दिवसा वीजपुरवठयाचे लक्ष्य, कृषी ग्राहकांच्या थकबाकीवर ६६ टक्क्यांपर्यत सुट, ग्रामपंचायतीचा सहभाग व सक्षमीकरण, कृषी ग्राहकांचा सर्व व्यवहाराकरीता ऑनलाईन पध्दतीने करण्याचे आवाहन, माझे विज बिल माझी जबाबदारी, कृषी ग्राहकांकरीता पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण, शेतकऱ्यांचा पैसा त्यांच्याच पायाभूत सुविधांसाठी यासंबंधी सविस्तर माहिती दिली.

तत्पुर्वी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या हस्ते महावितरणतर्फे महाकृषी उर्जा अभियान- कृषी उर्जा पर्व पुस्तिकेचे तसेच सदरील अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले टीशर्ट, टोपी व मास्क याचे विमोचन करण्यात आले. तसेच जागतिक महिला दिनानिमीत्त उपस्थित महिला अधिकारी-कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

याबैठकीस सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: