
परभणी, दि.5 :- सद्यस्थितीत जिल्हयात कोरोना संसर्गात होणारी वाढ पाहता सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबतीत निर्बंध घालणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हयातील सर्व धार्मीक स्थळांमध्ये होणारी गर्दी पाहता धार्मीक स्थळे दि. 7 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता या कालावधीत वाढ करुन जिल्हयातील धार्मीक स्थळे बंद दि. 15 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले जात आहेत. तसेच धार्मीक स्थळामध्ये दैनंदिन विधी पार पाडण्यासाठी 5 व्यक्तींना परवानगी राहील. असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी निर्गमित केले आहे.
-*-*-*-*-
