Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी निदर्शने, रास्तारोकोला बंदी

 

 

परभणी दि.5 :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनांकडून आयोजित करण्यात येणारे मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको, उपोषण व सर्व प्रकारची आंदोलने इत्यादीवर दि.15 मार्च 2021 पर्यंत बंदी घालण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी निर्गमित केले आहेत. तरी या आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग नियंत्रण प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नूसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: