Maharshtra News Parbhani News

 अवैध रेती…

 

अवैध रेती साठ्यांचा 4 मार्चला जाहीर लिलाव

          

परभणी, (जिमाका) दि. 2 :- तहसील कार्यालय परभणी अंतर्गत अवैध रेतीसाठा जप्त केल्याबातचा अहवाल सादर केला असून त्याअनुषंगाने गुरुवार दि. 4 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता परभणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात (सावंगी खुर्द या गावातील ) तहसिल कार्यालय परभणी येथील प्रांगणात जप्त 52 ब्रास अवैध रेती साठ्याचा जाहिर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती परभणीचे उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी दिली आहे.

जप्त रेती साठ्यातील रेती खरेदीसाठी लिलावात भाग घ्यावयाचा असल्यास इच्छुकांनी दि. 4 मार्च  रोजी अटी व शर्तीच्या अधिन राहून लिलावात बोली बोलता येईल. सरकारी किमतीच्या एक चर्तुतांश रक्कम लिलाव सुरु होण्यापुर्वी लिलावात भाग घेणाऱ्यांकडून घेण्यात येईल. लिलावधारकांनी रेती तहसिल कार्यालय परभणी येथे खाजगी वाहनांद्वारे साठवणूक करीता वाहतूक केल्याचा खर्च रक्कम रुपये 1 लाख 30 हजार बोलीच्या रक्कमेशिवाय भरणे आवश्यक आहे. सदरील रक्कम भरणा केल्याशिवाय लिलाव अंतीम केला जाणार नाही. लिलाव झालेल्या दिवशी लिलाव धारकांने सपुर्ण रक्कम भरावी लागेल. शासन आदेशानुसार जीएसटी कराचा भरणा करणे बंधनकारक असेल. बोली लावून साठा घेवून संपुर्ण रक्कम भरणा न केल्यास संबंधितांविरुध्द फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल. रेतीसाठा तातडीने त्यांच्या स्वखर्चाने साठवणूक केलेल्या ठिकाणावरुन उचल करावा लागेल. अपेक्षित रेतीसाठ्याच्या प्रमाणात वाहतूक पासेस लिलावधारकास दिल्या जातील. विहीत कालावधीत साठ्याची उचल न केल्यास फेरलिलाव करण्यात येईल. जशास तशा स्थितीमध्ये रेतीसाठा घ्यावा लागेल. लिलावात भाग घेणाऱ्यांकडे ओळखपत्र, पॅनकार्ड, टॅनकार्ड असणे आवश्यक आहे. लिलावधारकाने गौण खनिज विकास प्रतिष्ठाणची 10 टक्के रक्कम जमा करावी लागेल. कार्यालयाच्या दर्शविलेल्या पत्त्यावर लिलावात बोली बोलणाऱ्यांची जबाबदारी राहील. लिलाव अंशत: अथवा पुर्णत: रद्द करण्याचे अधिकारी उपविभागीय अधिकारी यांचे राहतील. रेती साठ्याची रक्कम भरणा केल्यानंतर 3 दिवसात रेती वाहतुक पासेसकरीता जिल्हा खनिकर्म अधिकारी परभणी यांच्याकडून वाहतुक पासेस हस्तगत करावेत. कोविड-19 च्या प्रार्दुभावामुळे  स्वत: मास्कचे परिधान करुन उपस्थित राहून सोशल डिस्टन्सिंग नियम पाळावेत. तसेच वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. असे परभणीचे उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी कळविले आहे.

                                                            -*-*-*-*-       

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: