

संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन
परभणी दि.23 :- थोर समाजसुधारक आणि कीर्तनकार संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नायब तहसीलदार अशोक मिरगे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर , रामदास कोलगणे , सोपान ठोंबरे, प्रविण कोकांडे, पंढरीनाथ शिंदे,निलेश देशमुख,लिंबाजी लुले,उमेश शिंदे ,काळे, वैजनाथ भेंडेकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
-*-*-*-*-
