National News

लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने टरबूज उत्पादक धास्तावले …..!!!

लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने टरबूज उत्पादक धास्तावले …..!!!
अर्धापूर ( शेख जुबेर ) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने महाराष्ट्रात संचारबंदी किंवा लॉकडाऊन लागल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने टरबूज व खरबूज उत्पादकाची झोप उडाली आहे .

महाराष्ट्रातील काही भागात संचारबंदी व धारा १४४ लागू केल्याने टरबूज व खरबूजाची मागणी मंदावली आहे यामुळे टरबूजाच्या दरात घट झाली आहे मागील वर्षात जसे लॉकडाऊनची मर्यादा वाढतच गेल्याने शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसला होता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली तर टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही .
अर्धापुर तालुक्यात सिंचन सुविधा उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी टरबूज व खरबूज फळपिकांची लागवड केली आहे तसेच यावर्षीत टरबूज व खरबूज पिकासाठी पोषक वातावरण असल्याने तालुक्यात फळपिकांचे क्षेत्रात वाढ झाली आहे अनेक शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टरबूजाची लागवड केली होती ती आता तोडण्यात आली आहेत मात्र व्यापाऱ्यांनी माल खरेदीसाठी येत नसल्याने आणि खरेदी केले तरी कमी दर देत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत .
काही शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टरबूजाची लागवड केली आहे ती काही दिवसानंतर तोडणीस येणार आहे परंतु दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने देशात किंवा महाराष्ट्रात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकऱ्यांनी धसकी घेतली आहे .

चौकट
गेल्या महिन्यात टरबूज पिकाला मोठ्या प्रमाणात मर रोगाची लागण झाली होती शेतकऱ्यांनी महागडे औषधी वापरून मर रोगाला आटोक्यात आणले तर काही शेतकऱ्याचे टरबूजाचे प्लांटला प्लांट वाळून गेले मर रोगापासून बचावलेल्या टरबूजाला आता कोरोनामध्ये दर मिळतो की नाही हा प्रश्न उभा राहिला आहे लॉकडाऊन लागले तर टरबूज व खरबूज उत्पादकाना आर्थिक फटका बसणार आहे .

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: