
परभणी, दि.22 :- सेलू तालुक्यातील मौजे तिडी पिंपळगाव शिवारापासून 10 कि.मी.त्रिजेतील परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी, विक्री,वाहतूक, बाजार व जत्रा प्रदर्शने आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे आदेश जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी जारी केले आहेत.
सेलू तालुक्यातील मौजे तिडी पिंपळगाव शिवारात कोंबड्यांचे मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. मृत्यूचे कारण अद्याप येणे बाकी आहे. तरी अज्ञात रोगाचा प्रसार जिल्ह्यात व इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मौजे तिडी पिंपळगावात सर्वेक्षणाचे काम पुर्ण होईपर्यंत गावातील कुक्कुट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा प्रदर्शनास प्रतिबंध करण्यात आला आहे.
-*-*-*-*-
