Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीसाठीच्या संगणकीय प्रणालीमध्ये नोंदणी बंधनकारक

 

 

            परभणीदि.22 :- महाराष्ट्र शासनाने दि.5 फेब्रुवारी 2021 रोजीच्या परिपत्रकान्वये परराज्यातून होणाऱ्या वाळु वाहतूकीवर काही निर्बध घातले आहेत. तरी परराज्यातुन वाळू/रेती वाहतूक करण्यासाठी संबंधित व्यक्ती, संस्थांनी महाराष्ट्र राज्यामध्ये गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीसाठीच्या संगणकीय प्रणाली (महाखनिज) मध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे परराज्यातून वाळू आणणाऱ्या सर्व व्यक्ती व संस्थांनी तरतुदीचे पालन करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी केले आहे.

            संबंधित व्यक्ती, संस्था परराज्यातून आणलेल्या वाळुचा साठा करुन विक्री करणार असेल तर महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम 2013 मधील नियम 71 ते 78 मधील तरतूदीनूसार व्यापारी परवाना घेणे आवश्यक आहे.  इतर राज्यातून रस्त्याने व जलमार्गाने आणलेली वाळु महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रवेश करणार आहे त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आणि परराज्यातून रेल्वेने आणलेल्या वाळू करीता ती ज्या रेल्वेस्टेशनवर खाली करण्यात येणार आहे. त्या जिल्ह्यात राज्य शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेलया स्वामित्वधन दराच्या 10 टक्के एवढी प्रतिब्रास रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये जमा करणे आवश्यक राहील. ही रक्कम भरणा केल्यानंतरच संबंधितांना झिरो रॉयल्टी पास देण्याबाबतची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय करेल. तसेच संबंधित व्यक्ती अथवा संस्था हे ज्या जमिनीवर परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा करेल ती जमीन अकृषक असणे आवश्यक आहे. वाळूचा साठा व विक्रीची दैनंदिन नोंद साठ नोंदवहीत घेणे आवश्यक असून या नोंदवहीची क्षेत्रिय कार्यालयाकडून वेळोवेळी तपासणी करण्यात येईल.  परराज्यातून आणलेल्या वाळूचा वाळूसाठा वैध परवान्यापेक्षा जादा आढळल्यास अथवा वाहतूक झिरो रॉयल्टी पासेस शिवाय केलेली आढळून आल्यास महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 कलम 48(7) व 48 (8) नुसार दंडात्मक कारवाईसाठी पात्र राहील. असे उपविभागीय अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: