National News

अर्धापूर तालुक्यात पुन्हा कोरोना…!

अर्धापूर तालुक्यात पुन्हा कोरोना…!

अर्धापूर ( शेख जुबेर ) तालुक्यातील ग्रामीण भागात रविवार रोजी एक पुरूष कोरोना बाधित आढळल्याने,तालुक्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाल्याने व कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
अर्धापूर तालुक्यामध्ये दुसऱ्या लाटेत कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लावले असुन सुरक्षित अंतर,विना मास्क फिरणाऱ्यांना ५०० रूपये दंड लावण्यात येत आहे. यावेळी ८२ जणांच्या तपासण्या केल्या असून कामठा येथील १ पुरूष बाधित आढळला असून नांदेड जिल्ह्यासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यामुळे प्रसार थांबावा यासाठी अर्धापूर आरोग्य विभाग दुसऱ्या टप्प्यात कोरोनाच्या अनुषंगाने सज्ज झाला आहे.
तालुक्यातील परिसर कोरोना पासून सुरक्षित होता परंतु कामठा येथील एक पुरूष बाधित निघाला असून त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांची तपासणी करण्यात आली व त्यांना १६ दिवसासाठी होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.परिसरातील नागरिकांनी घराच्या बाहेर न पडता गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवावे व स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य विभाग,तहसील प्रशासन, नगरपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.तालुक्यातील बाधित झालेल्यांची एकुण संख्या ३९४,उपचारानंतर बरे झालेल्यांची संख्या ३८२,मृत्यु झालेल्यांची संख्या ११ व उपचार घेत असलेल्यांची संख्या ०१ आहे.अशी माहिती ता.आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

▪️▪️प्रतिक्रिया▪️▪

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने नागरिकांनी नियमाचे पालन करावे गर्दी टाळावी,मास्कचा वापर करावा आपले कुटुंब आपली जबाबदारी याप्रमाणे सर्वांनी काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे.
-डॉ.विद्या जिने
आरोग्य अधिकारी अर्धापूर

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: