Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरूण देशपांडे यांचा दौरा

         परभणी, दि.22 :- राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

         बुधवार दि. 24 फेब्रुवारी 2021 रोजी पुणे येथून सकाळी 6 वाजता परभणी येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. सकाळी 10:30 ते 11 वाजता जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांच्यासोबत बैठक व चर्चा, सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे शालेय पोषण आहार संबंधी शिक्षणाधिकारी व महापालिका प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत बैठक व चर्चा, दुपारी 3:30 ते 6 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) व प्रकल्प अधिकारी (शहरी व ग्रामीण) तसेच पंतप्रधान मातृ वंदन योजनाबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासोबत बैठक व चर्चा, सायंकाळी सहा वाजता शासकीय विश्रामगृहाकडे रवाना व मुक्काम करतील.

        गुरुवार दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील शालेय पोषण आहार संबंधी गोदामांना भेटी व एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाड्यांना भेटी.

          शुक्रवार दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत स्वस्त धान्य दुकाने तसेच शासकीय धान्य गोदामाना भेटी. सायंकाळी सहा वाजता शासकीय विश्रामगृहाकडे रवाना व मुक्काम करतील.

         शनिवार दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता परभणी येथून पुणेकडे रवाना होतील.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: