National News

अर्धापुरात विना मास्क फिरणा-यांविरूध्द द ंडात्मक कार्यवाही , अधिकारी व पदाधिकारी उतरल े रस्त्यावर., 26हजार दंड वसूल..

अर्धापुरात विना मास्क फिरणा-यांविरूध्द दंडात्मक कार्यवाही , अधिकारी व पदाधिकारी उतरले रस्त्यावर., 26हजार दंड वसूल..

अर्धापूर ( ( शेख जुबेर ) कोरोनाचा वाढती रूग्ण लक्षात घेता प्रतिबंधाकत्मक उपाय योजनांची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे .विना मास्क फिरणा-यांविरूध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.ही कार्यवाही करण्यासाठी पदाधिकारी व अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत.तर शहरातील उपहारगृह, मंगलकार्यालय, खासगी आस्थानांच्या मालकांना नोटीस देवून योग्य त्या उपाययोजनांची खबरदारी घेण्याची कळविले आहे.नियमांचे उल्लंघन करणाविरूध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे.विना मास्क फिरणा-या पाचशे रूपये दंड आकरण्यात येत आहे.

कोरोना रूग्णांची संख्या वाढत आसल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे.शासनाने व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे युद्ध पातळीवर अंमलबजावणी नगरपंचायत ,तहसील व पोलीस विभाग पालन करित असून प्रशासनाने धडक कार्यवाही सुरू केली.या कार्यवाहीत पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.

शहरातील बसवेश्वर चौक, बसस्थानक परिवारात विना मास्क फिरणारे नागरिक,वाहनचालक यांना थांबवून दंड आकारला गेला.आचनक झालेल्या कार्यवाहीने नागरिक चांगलेच भांबावून गेले.

शहरातील उपहारगृह ,मंगलकार्यालय , किरणा दुकान, गर्दी होण्याचे ठिकाण ,विविध व्यवसायीक यांना नोटीस देवून योग्य ती खबरदारी घेण्यासाठी कळविण्यात आले आहे.तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवणे,मास्कचा वापर करणे ,सॅनीटायझरचा नियमित वापर करणे ,योग्य अंतर ठेवून संभाषण करणे आदी सुचना देण्यात आल्या आहेत.

नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी मारोतराव जगताप ,डाॅ विशाल लंगडे, शेख लायक , स्वच्छता अधिकारी गवळी, मदन डाके, कैलास गायकवाडच्या,शिवाजी कांबळे,शिवानंद खंडागळे,शिवाजी वाघमारे , विजय पोले, व्यंकटि गोरे अदि अधिकारी व कर्मचारी या विशेष मोहीमेत सहभागी झाले.या कार्यवाहीत 26 हजार 200 दंड वसूल करण्यात आला.तर पोलीस उपविभाचे पोलीस उपनिरिक्षक कपील आगलावे अदि सहभागी झाले.

शहरातील सर्व खासगी आस्तापने ,किरणा दुकान ,मंगलकार्यालयांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.नियमांचे उल्लंघन करणा-याविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात येईल आशी माहिती प्रभारी मुख्याधिकारी मारोतराव जगताप यांनी दिली.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: