Maharshtra Marathi News

मोठी बातमी! अमरावतीमध्ये आठवडाभरासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा

अमरावती:कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता अमरावतीत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होत असताना राज्यात अनलॉकनंतर पहिला लॉकडाऊन हा अमरावतीत जाहीर करण्यात आला आहे. अमरावतीत सोमवार संध्याकाळी ८ वाजल्यापासून अमरावती शहर, अचलपूर शहरात पुढील आठवडाभर कडक लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी दुपारी ४ वाजता केली आहे.

अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे. “सगळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याने हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अमरावतीकरांनी याचं पालन करावं. आम्हाला आता नाईलाजास्तव फक्त जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू ठेवावी लागणार आहे. इतर सारंकाही पूर्णपणे बंद असणार आहे. तसेच शहरातील बाजार हे गाईडलाइन्सनुसारच सुरू राहतील”, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: