Maharshtra Marathi News

औरंगाबादेत कोरोनाची लस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानं खळबळ

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाचं प्रमाण वाढत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही करण्यात आलाय. विशेष म्हणजे वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या मोहिमेलाही वेग आलाय. फ्रंटलाईन वर्कर आणि वैद्यकीय कर्मचारी, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. आता औरंगाबादेत कोरोनाची लस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडालीय.

आठ दिवसांपूर्वी कोरोनाची लस घेतलेल्या पोलिसाचा मृत्यू
औरंगाबादेतील एका पोलिसांनं आठ दिवसांपूर्वी कोरोनाची लस घेतली होती. कर्तव्यावर असताना श्वास घेण्यास त्या पोलिसाला अडचण येत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, अखेर उपचारादरम्यान त्या पोलीस हवालदाराचा मृत्यू झालाय. भास्कर शंकर मेटे हे पोलीस हवालदार बेगमपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

सिटी स्कॅनमध्ये आढळली कोरोनाची लक्षणे
कर्तव्यावर असताना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. सिटी स्कॅनमध्ये कोरोनाची लक्षणेही आढळली होती. आता हर्सूल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय. 13 फेब्रुवारीला कोरोना लसीचा पहिला डोस त्या पोलीस हवालदारानं घेतला होता, अखेर त्या पोलिसाचा मृत्यू झालाय.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: