Maharshtra Marathi News

मरावाड्यात कोरोनाता वाढता धोका, औरंगाबाद आणि परभणीत प्रशासनाकडून महत्वाचे निर्णय

औरंगाबाद : विदर्भासह मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद आणि परभणी जिल्हा प्रशासनानं महत्वाचे निर्णय घेतले आहेत. औरंगाबाद शहरातील 10 वी आणि 12वीचे वर्ग वगळता सर्व वर्ग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्या पाठोपाठ आता परभणी जिल्ह्यातही 10 वी आणि 12वीचे वर्ग सोडून अन्य वर्गाच्या शाळा 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा आदेश परभरणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. 10 वी आणि 12वी व्यतिरिक्त इतर सर्व शिक्षकांनी ऑनलाईन साधनांचा वापर करावा, असंही या आदेशात नमुद करण्यात आलं आहे.(Important decisions of Aurangabad and Parbhani administration)

परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसंच काही शाळांमध्ये शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील 9वी आणि 11वीचे वर्ग तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. दुसरीकडे औरंगाबादेतील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. कोरोनाचा चढता आलेख लक्षात घेता येथील प्रशासन सतर्क झाले आहे. औरंगाबाद माहनगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी शहरातील सर्व शाळा पुन्हा बंद करण्याचा आदेश दिला आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: