Maharshtra Marathi News Nanded Marathi News

 सुरक्षित…

 

सुरक्षित वाहतुकीसाठी

वाहतूक नियामांचे पालन करा

         प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत

नांदेड (जिमाका) दि. 18:- सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे पालन करुनरस्ते अपघातातील जखमींना मदत करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेशकामत यांनी केले. नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आयोजित 32 वा रस्ता सुरक्षाअभियानाचा समारोप येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात आज पार पडला, यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्री. कामतबोलत होते.   

याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारीअविनाश राऊत, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुलजाधव यांची प्रमुखउपस्थिती होती. याअभियानानिमित्त विद्यार्थी नागरिकांसाठी आयोजित केलेल्या निबंध चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण यावेळी करण्यात आले. 

जिल्ह्यातील रस्ते अपघात अपघातील मृत्यूकमी करण्याच्या उद्दिष्टाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 18 जानेवारी ते17 फेब्रुवारी याकाळात सायकल रॅली, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, पथनाट्य, चित्ररथाद्वारे जनजागृती कार्यक्रम, प्रबोधन शिबिरे अशाविविध उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यातआली. या अभियानात जिल्ह्यातील मोटर ड्रायव्हिंग स्कूल वाहन वितरकपीयूसी सेंटर फकीरासेवाभावी संस्था विविधसंघटना संस्थांनी सक्रिय सहभागघेतला. त्याबद्दल त्यांचा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याहस्ते सत्कार करण्यातआला. यावेळी उपस्थित विद्यार्थी पालकांपैकी काहींनी उत्स्फूर्तपणे भाषणे केली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रुपाली येंबरवार श्रीमतीजयश्री वाघमारे यांनीकेले तर सहायकप्रादेशिक परिवहन अधिकारीअनंत भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.राजेश गाजूलवाड, श्री.नंदकिशोर कुंडगीर, श्रीमती भलगे तसेचकार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी यांनीपरिश्रम घेतले.

00000


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: