Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

 वृत्त क्र….

 

वृत्त क्र. 64                                         दि. 18 फेब्रुवारी, 2021

कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर

तात्काळ अन्टीजन/आरटीपीसीआर तपासणी करुन घेण्याचे आवाहन

परभणी, दि. 18 :- कोव्हीड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट जिल्ह्यात  येऊ नये यासाठी जनतेनी ताप, सर्दी, खोकला तसेच साधारण सौम्य लक्षणे जरी असले तरी अॅन्टीजन किंवा आरटीपीसीआर तपासणी तात्काळ करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी गर्दी टाळणे, तोंडाला मास्क लावणे व शासनाने वेळोवेळी जे आदेश निर्गमित केले आहे त्याचे पालन करून जनतेने सहकार्य करावे असे त्यांनी स्पष्ट केले.

कोव्हीड-19 अर्थात कोरोना विषाणू संसर्गाची संभाव्य दुसरी लाट जिल्हयात न येण्याकरीता जिल्हयातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिक व मेडिकल असोसियशनची आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना, महानगर पालिका आयुक्त रमेश पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, महानगर पालिका उपायुक्त प्रदिप जगताप, महानगर पालिका आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत हे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी मुगळीकर म्हणाले की, महाराष्ट्रात मागील महिन्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असून जिल्हयातही रुग्णांची संख्या वाढली आहे. सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे आलेल्या रुग्णामध्ये कोवीड-19 ची लक्षणे आढळल्यास त्या रुग्णांचे समोपदेशन करुन अॅन्टीजन किंवा आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी. तसेच कोव्हीड लसीकरण सर्व खाजगी डॉक्टरांनी व त्यांच्या स्टॉफनी करुन घ्यावी व कोव्हीड लसीकरणाबाबत जनजागृती करावी असे सांगितले.

कोव्हीड-19 विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हयात दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी आपले रुग्णालय व इन्फास्ट्रकचर सुस्थितीत तयार करुन ठेवावे. तसेच कोवीड सेंटर उभारणी करीता प्रशासकीय परवानगी लागल्यास त्यांना तात्काळ परवानगी देण्यात यईल. तसेच ऑक्सीजन सिलेंडर लागल्यास प्रशासनामार्फत ऑक्सिजन सिलेंडरही उपलब्ध करुन देण्यात येतील असे जिल्हाधिकारी म्हणाले.

कोव्हीड चाचण्या वाढविण्याकरिता कॅम्पचे आयोजन करण्यावर आरोग्य विभागाने भर दिला पाहिजे. मागील वर्षी सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिक, नर्स व हेल्थ वर्कर यांनी कोरोना विषाणू आजार रोखण्याकरीता  खुप चांगले काम करुन प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले आहे. आताही या सहकार्याची अपेक्षा आहे असे ते यावेळी म्हणाले.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव पाहता जनतेने तोंडला मास्क लावणे, हात सॅनिटाईझ करणे आणि सामाजिक अंतर राखून या नियमाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या बैठकीस इंडियन मेडिकल असोशियसन, आयुर्वेद व्यवसायिक, निमा असोशियसन, होमिओपॅथिक असोशियसन, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोशियसनचे अध्यक्ष, सदस्य व खाजगी वैद्यकीय व्यवसायिक, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.        

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: