Maharshtra Marathi News

वर्ध्यात संचारबंदी लागू, वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा बंद

वर्धा : संपूर्ण राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने राज्यातील सर्वच पालिका खडबडून जाग्या झाल्या आहेत. वर्धा जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वर्ध्यात वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. तसेच पेट्रोल पंप देखील बंद राहणार आहेत. शनिवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 8 वाजेपर्यंत वर्ध्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना लागू करण्यास सुरुवात केली आहे. वर्धा जिल्ह्यात 36 तास संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. यानुसार शनिवार रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: