Nanded Marathi News

नांदेड:45 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू 30 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 19 :- शुक्रवार 19 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 45 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 23 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 22 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 30 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 749 अहवालापैकी 700 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 33 एवढी झाली असून यातील 21 हजार 935 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 295 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 11 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. शुक्रवार 19 फेब्रुवारी रोजी श्रीनगर नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 592 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 6, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 18, माहूर तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 5 असे एकूण 30 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.23 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 19, हदगाव तालुक्यात 1, हिंगोली 1, धर्माबाद 1, नायगाव 1 असे एकुण 23 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 19, देगलूर तालुक्यात 1, अर्धापूर 1, माहूर 1 असे एकूण 22 बाधित आढळले.

जिल्ह्यात 295 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 25, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 26, किनवट कोविड रुग्णालयात 15, हदगाव कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 163, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 22, खाजगी रुग्णालय 40 आहेत.

शुक्रवार 19 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 159, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 81 एवढी आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: