Nanded Marathi News

नांदेडची चिंता वाढली، कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट،एकाचा मृत्यू

नांदेड (जिमाका) दि. 18 :- गुरुवार 18 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 58 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 28 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 30 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 35 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 619 अहवालापैकी 558 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 988 एवढी झाली असून यातील 21 हजार 905 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 281 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 11 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. बुधवार 17 फेब्रुवारी रोजी भोकर येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 591 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 23, किनवट कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 7, भोकर तालुक्यांतर्गत 1, बिलोली तालुक्यांतर्गत 1, हैदरबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 35 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.28 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 19, भोकर तालुक्यात 2, हिमायतनगर 1, पुणे 1, नांदेड ग्रामीण 2, हदगाव 1, हिंगोली 2 असे एकुण 28 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 18, किनवट तालुक्यात 5, बिलोली 1, परभणी 1, मुदखेड 2, कंधार 1, देगलूर 1, यवतमाळ 1 असे एकूण 30 बाधित आढळले.

जिल्ह्यात 281 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 25, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 27, किनवट कोविड रुग्णालयात 15, हदगाव कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 146, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 32, खाजगी रुग्णालय 33 आहेत.

गुरुवार 18 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 159, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 82 एवढी आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 20 हजार 670

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 93 हजार 270

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 988

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 905

एकुण मृत्यू संख्या-591

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.28 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-281

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-11.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: