Maharshtra Marathi News Nanded Marathi News

 महाडीबीटी…

 

महाडीबीटी प्रणालीवरील विद्यार्थ्यांच्या

 शिष्यवृत्तीबाबत आवाहन

औरंगाबाद, दि.17, (विमाका) :- ज्या विद्यार्थ्यांची महाडीबीटी प्रणालीवरील शिष्यवृत्ती जमा झालेली नाही, त्यांनी प्राचार्य किंवा लिपिक लॉगीन मधुन संबंधित विद्यार्थ्यांचा त्या शैक्षणिक अर्ज क्रमांक नमुद करुन खालील आवश्यक बाबी तपासुन घ्याव्यात असे आवाहन जलील शेख, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, औरंगाबाद यांनी जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांना केले आहे.

 

सन 2018-19 पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी पोर्टल दिनांक 01.10.2018 पासून नव्याने सुरू करण्यात आले असुन त्यांचे हे संकेतस्थळ आहे. सदरील पोर्टल हे संचालक, माहिती व तंत्रज्ञान यांच्यातर्फे कार्यरत करण्यात आले आहे. सदर संकेतस्थळावरुन अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्रच्या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांचे शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील अर्ज स्वीकारण्यासाठी दिनांक 03.08.2019 पासून कार्यन्वित करण्यात आले होते. सन 2019-20 मधील विद्यार्थ्यांना भरलेल्या अर्जांवर कार्यवाही करण्यासाठी दिनांक 17 जुलै 2020 पर्यंत मुदत वाढविण्यात आली होती.

 

अर्जांवर सहायक आयुक्त, समाज कल्याण औरंगाबाद यांनी प्रणालीद्वारे ऑनलाईन मान्यता प्रदान केल्यावर आयुक्तालयस्तरावरुन त्यांचे देयके तयार करुन कोषागारातुन देय असलेली रक्कम पारीत करुन महाडीबीटी पोर्टच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. सदर देय असलेली रक्कम ही पीएफएमएस या केंद्रभुत वितरण प्रणालीमधुन विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या बँक खात्यामध्ये थेट महाडिबीटी प्रणालीद्वारे जमा होणे अपेक्षित आहे. तद्पुर्वी पीएफएमएस प्रणालीमधून वितरण करण्यापूर्वी लाभार्थ्यांच्या आधार क्रमांक बँक खात्यास संलग्न असल्याचे या केंद्रभूत पडताळणी प्रणालीमधून मान्य झालेल्या पात्र लाभार्थ्यांचे आधार व बँक खात्याची पडताळणी करण्यात येते.

 

या पडताळणी प्रक्रियेस पीएफएमएस व एनपीसीएस यांच्याच स्तरावर विलंब होत असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. याबाबत आयुक्तालयास्तरावरुन व शासनस्तरावरुन माहिती व तंत्रज्ञान संचालनालयास तसेच राज्यस्तरावरील पीएफएमएस व एनपीसीएस कार्यालयांना वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे.

 

या शिवाय देयक जनरेट झालेल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती वितरण सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टल प्रणालीवरील व या प्रणलीद्वारे चालु असून सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम आधारसंलग्न बँक खात्यात अद्याप जमा व्हावयाची आहे. सदरील रक्कम पीएफएमएस प्रणालीद्वारे वितरीत होण्यास खालील कारणांमुळे विलंब होत आहे, असे संबंधित विभागाकडून कळविण्यात आले आहे.

 

1) नॉन आधार अर्ज नोंदणी केलेल्या अर्जांमध्ये आधार क्रमांक अद्यावत नसणे.2) विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी संलग्न नसणे. 3) विद्यार्थ्याचे आधार क्रमांक इनक्टीव असणे. 4) विद्यार्थ्यांना व्हाऊचर रिडीमन करणे. 5) विद्यार्थ्यांच आधार संलग्न असलेले बँकेतील खाते बंद असणे. 6) विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांक बंद असणे. 7) दुसऱ्या हफ्त्यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची उपस्थिती अद्यावत करण्याकरिता अर्ज प्रलंबित असणे.

 

तरी ज्या विद्यार्थ्यांची महाडीबीटी प्रणालीवरील शिष्यवृत्ती जमा झालेली नाही, त्यांनी प्राचार्य किंवा लिपिक लॉगीन मधुन संबंधित विद्यार्थ्यांचा त्या शैक्षणिक अर्ज क्रमांक नमुद करुन खालील आवश्यक बाबी तपासुन घ्याव्यात असे आवाहन जलील शेख, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, औरंगाबाद यांनी जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांना केले आहे.

*****

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: