
परभणी, दि.15 :- जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी (सामान्य) डॉ. संजय कुंडेटकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजूषा मुथा, जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, अशोक मिरगे, श्री.कोलगणे, श्री. बोराडे यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
-*-*-*-*-
