Maharshtra Marathi News Nanded Marathi News

 विद्यापीठ…

 

विद्यापीठ परिसरात आता साकारेल

शासकिय अध्यापक महाविद्यालयाची नवीन वास्तू

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश

नांदेड (जिमाका) 12 :-  सन 1968 पासून येथे कार्यान्वित असलेल्या शासकिय अध्यापक महाविद्यालयास आता सुमारे 14 कोटी 50 लाख रुपयांची भव्य वास्तू मिळणार असून लवकरच नांदेडच्या शैक्षणिक वैभवात या परिपूर्ण वास्तुतून विस्तार साधला जाणार आहे. बी.एड. महाविद्यालयाची ही वास्तू साकारावी यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करुन नांदेडच्या शैक्षणिक हब मधील ही कमतरता भरुन काढली आहे. 

नांदेडमधील जुन्या महाविद्यालयांपैकी एक असलेल्या शासकीय अध्यापक महाविद्यालयास स्वतःची इमारत नव्हती. भाडेतत्त्वावर जागा किरायाने घेऊन हे महाविद्यालय सुरु होते. महाविद्यालयाचा दर्जा ठरविणाऱ्या युजीसीची नॅक कमिटी व नॅशनल कॉन्सील फॉर टीचर एज्युकेशन (एनपीसीई) या संस्थेने सुद्धा महाविद्यालयास स्वतःची इमारत असावी, असे सूचित केले होते. 

यासंदर्भात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष लक्ष घालून शासकीय अध्यापक महाविद्यालयास स्वतंत्र इमारत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या इमारतीसाठी जागेची आवश्यकता होती. अशावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या समवेत बैठक घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात आता या महाविद्यालयास जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  या जागेवर आता 14.41 कोटी रुपयांची भव्य वास्तू उभारली जाणार आहे. 

या इमारतीमध्ये अध्यापनासाठीच्या सुसज्य खोल्या, कार्यालय, ग्रंथालय, पार्किंग, अग्निशमन यंत्रणा, सौरउर्जा प्रकल्प यासह सर्व सोयी राहणार आहेत. ईबीसी वसतिगृहानंतर केवळ आठ दिवसात शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या नवीन वास्तूस शासनाने मान्यता दिली असून नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्रात नवी भर पडली आहे.

00000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: