National News

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या मराठ वाडा उपाध्यक्षपदी शेख शकील यांची निवड

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी शेख शकील यांची निवड

अर्धापूर ( शेख जुबेर )

अर्धापूर तालुक्यातील देळुब. बु.येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार शेख शकील मोहम्मद युसुफ,यांची औरंगाबाद येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन च्या मराठवाडा उपाध्यक्षपदी,व श्री सलीम पठाण यांची नांदेड जिल्हा अध्यक्षपदी,संस्थापक अध्यक्ष माननीय रविभाऊ वैद्य, मराठवाडा अध्यक्ष श्री राज ठाकरे, दैनिक मराठवाडा केसरी चे मुख्यसंपादक श्री छबुराव ताके , यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. त्यांना नियुक्ती पत्र महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष,व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
पोलीस बॉईज ही असोसिएशन पोलीस कुटुंब व जनतेच्या न्याय हक्कासाठी काम कारणांरी व पोलीसांच्या मुलांना पोलीस भरतीती मध्ये ५ टक्के आरक्षण मिळून दिलेली तथा रनिंग मध्ये ५० सेंकेंड वाढून दिलेली एकमेव असोसिएशन आहे. यावेळी शेख मौला जिल्हा सरचिटणीस, गंगाधर सुर्यवंशी जिल्हा सचिव, शेख खदीर जिल्हा कार्याध्यक्ष, व्यंकटी जाधव जिल्हा उपाध्यक्ष, शेख शाकेर जिल्हा कोषाध्यक्ष, आनवर पठाण जिल्हा सहसचिव, मो.पाशा नांदेड शहरउपाध्यक्ष तसेच सर्व मित्र परिवारानी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: