Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीतील जप्त वाहनांच्या ई-लिलावाद्वारे विक्रीस मुदतवाढ

              परभणी, दि.12 :- अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईमध्ये वाहने जप्त करण्यात आले आहेत. ही  अवैध गौण खनिज वाहने तहसील कार्यालय परभणी या कार्यालयाच्या प्रांगणात  असून आहेत त्या स्थितीमध्ये जाहीर लिलाव पद्धतीद्वारे लिलाव पद्धतीद्वारे लिलाव पद्धतीद्वारे विक्रीस दि. 18 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 
          ई- लिलाव प्रपत्र अ प्रपत्र अ www.eauction.gov.in या संकेत स्थळावर दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 पासून ते दि. 18 फेब्रुवारी 2021 रोजीच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाहता व डाऊनलोड करता येतील. या लीला बाबत दिनांक 19 व 20 फेब्रुवारी या दोन दिवसात कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असून दि. 22 फेब्रुवारी 2021 रोजी लिलाव करण्यात येणार आहे.  लिलावाबाबतच्या  अटी व शर्ती व इतर माहितीसाठी www.eauction.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिकाधिक व्यक्तींनी लिलावात सहभाग घ्यावा. असे परभणीचे तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी कळविले आहे.
 -*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: