Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा 13 फेब्रुवारीला अभिनव उपक्रम

    परभणी,  दि. 12 :-    जिल्ह्यातील विद्यार्थी-पालक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्था यांच्या अडी-अडचणीवर चर्चा करुन त्या सोडविण्याच्यादृष्टीने ‘उच्च व तंत्र शिक्षण विभाग @’ हा अभिनव उपक्रम उच्च तंत्र शिक्षण विभागाने सुरु केला आहे. उपक्रमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री, राज्यमंत्री, प्रधानसचिव आणि संचालक पुणे इत्यादी मान्यवर शनिवार दि.13 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत.
            या उपक्रमात विद्यार्थी-पालक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्था यांच्या अडी-अडचणीवर चर्चा करुन त्या सोडविण्याच्यादृष्टीने काही प्रश्न, अडीअडचणी व उच्च शिक्षणाच्या विकासाविषयक सूचना असतील तरी त्या jdhe.nanded-mh@gov.in मेल आयडीवर पाठविण्यात याव्यात. असे  उच्च शिक्षण विभागाच्या सह संचालक डॉ.नलिनी टेंभेकर यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: