National News

अर्धापूर तालुक्यातील १६ ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवड शांततेत पार… अम राबाद तांडा येथील उपसरपंच पद रिक्त

अर्धापूर तालुक्यातील १६ ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवड शांततेत पार…

अमराबाद तांडा येथील उपसरपंच पद रिक्त

अर्धापूर ( शेख जुबेर ) तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील,अर्धापूर तालुक्यात १६ गावातील सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी करण्यात आल्या तर अमराबाद तांडा येथील उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल न झाल्याने येथील पद रिक्त राहिले आहे.असी माहिती तालुका निवडणूक अधिकारी तथा नायब तहसीलदार मारोतराव जगताप यांनी दिली.
तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील १६ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी झाल्या यावेळी पिंपळगाव म.येथील मा.सरपंच सदाशिवराव देशमुख,वसंतराव कल्याणकर,भाऊरावचे संचालक अँड.सुभाषराव कल्याणकर,संतोष कल्याणकर,भो.वि.अ.मदन देशमुख यांच्या कॉंग्रेस व शिवसेना गटाचे सरपंच पदी लता कपील दुधाल सरपंच तर उध्दव बाळासाहेब कल्याणकर उपसरपंच ,कोंढा येथील युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तिरूपती कोंढेकर यांच्या गटाचे गोदावरी माधव पांचाळ सरपंच तर मिराबाई गंगाधर कदम उपसरपंच ,खैरगाव म. सरपंच से.संघाचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव चव्हाण यांच्या गटाचे छाया बालाजी लांडे सरपंच तर व्यंकटी जठणराव पवार उपसरपंच ,देळुब बु. येथील अजेरउल्ला खान अजमत खान पठाण सरपंच तर आम्रपाली सुभाष थोरात उपसरपंच,लोणी बु.कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते विजय भुस्से यांच्या गटाचे भुस्से वैष्णवी विजयकुमार सरपंच तर शेंडगे अरुणा भागवत उपसरपंच,लहान महाआघाडी शिवसेना व काँग्रेसचे माजी सरपंच सुधाकरराव पाटील इंगळे, शिवसेना तालुका उपप्रमुख सदाशिव इंगळे, डॉ उत्तमराव इंगळे, तुकाराम लोणे,शिवाजी पवार,शिवदास धारकर,शेख युनूस लहानकर,पप्पू अललवाड यांच्या गटाचे अमोल बालाजी इंगळे सरपंच तर शेख महेबुब रज्जाक उपसरपंच ,बारसगाव येथील येळेगाव गटाचे जि.प.सदस्य बबनराव बारसे यांच्या गटाच्या मनीषा गजानन खंडागळे सरपंच तर सरीता बालाजी गोदरे उपसरपंच,सोनाळा येथील शिवसेनेचे मा.सभाती दिलीपराव देबगुंडे यांच्या गटाचे देवगुंडे ब्रम्हानंदाबाई दिलीप सरपंच तर करडे बालाजी यादवराव उपसरपंच ,पाटनुर कै.बच्चुराज देशमुख ग्रामविकास पँनलचे गंगासागर बाळू कोकाटे सरपंच तर मिनाक्षी यशवंत शिंदे उपसरपंच,अमराबाद तांडा येथील ग्रामपंचायत बिनविरोध निवड झाली असून या ठिकाणी अश्वीन भवन पवार सरपंच तर उपसरपंच पद अप्राप्त,मेंढला बु.येथील मंगल धर्माजी गजभारे सरपंच तर मुक्ताबाई आनंदा यादव उपसरपंच ,बेलसर कॉंग्रेसचे रमेश भिमराव क्षीरसागर सरपंच तर अनुसया चिमनाजी क्षीरसागर उपसरपंच,मेंढला खु. दत्ता पाटील नवले यांच्या गटाचे सौ कुंताबाई उत्तमराव नवले सरपंच तर कचराबाई प्रल्हाद नवले उपसरपंच,शेनी येथील प्रिया आनंदराव धुमाळ सरपंच तर राजु दत्तरामजी धात्रक उपसरपंच ,शेलगाव बु. ज्ञानेश्वर बाबूराव राजेगोरे,हनुमान गंगाधर राजेगोरे यांच्या गटाच्या शांताबाई देविदास राजेगोरे सरपंच तर गोदावरी संजय राजेगोरे उपसरपंच,निमगाव येथिल अर्चना संजय मोळके सरपंच तर अनिता वसंत चव्हाण उपसरपंच पदी निवड झाली.
सदर निवडप्रक्रियेसाठी प्रत्येक गावात अध्यासी अधिकारी म्हणून मारोतराव जगताप,व्ही.एम.मुंडकर,एस.पी.गोखले,संजय खिल्लारे,प्रफुल्ल खंडागळे,ख्वाजा लतिफोदि्दन,आर.टी.सातव,एस.जी जामुदे,डी.व्ही.मोरलवार,जी.पी.वाघोळे,कल्याण पाटील,पी.डी.मारळकर,एस.एम.चातरमल,व्ही.व्ही.मुळे,प्रवीण जाधव यांनी काम बघितले तर तलाठी ग्रामसेवक यांनी सहकार्य केले. चोख पोलीस बंदोबस्तात निवड प्रक्रिया पार पडली.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: