Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

मध केंद्र योजनेसाठी अर्ज करावेत जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे आवाहन

 मध केंद्र योजनेसाठी अर्ज करावेत जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे आवाहन

 

     परभणीदि. 8 :- संपुर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना कार्यान्वित झाली असून पात्र व्यक्ती व  संस्थांनी अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, परभणी यांनी केले आहे.

            मध उद्योगांना मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती अशी या योजनेची वैशिष्टे आहेत. अर्जदार हा साक्षर असावा तसेच स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य राहील. वय 18 वर्षापेक्षा जास्त आणि 10 दिवसाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, कारेगाव रोड परभणी येथे संपर्क साधावा. असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: