Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

अंबर दिवा वापरासंदर्भात केंद्रीय मोटार वाहन नियमामध्ये सुधारणा

 

    परभणी,  दि. 8 :-    केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 108 मध्ये सुधारणा केली असून अंबर दिवा वापरा संदर्भात केंद्रीय मोटर वाहन नियमाप्रमाणे सुधारणा करावी. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी केले आहे.

            नवीन सुधारणाप्रमाणे एअरपोर्ट, बंदरक्षेत्र व खनिजक्षेत्र आणि प्रकल्पांच्या क्षेत्रात चालणाऱ्या वाहनांच्या टपावर अंबर दिवा लावता येणार आहे. केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या उच्च पदस्थांच्या वाहनांवरील लाल, अंबर दिवा लावण्याची तरतूद वगळली आहे.  उच्च पदस्थांच्या वाहनांना एस्कॉर्टिंग करणाऱ्या वाहनांवर दिवा लावण्याची तरतूद वगळण्यात आली आहे. ॲम्‍बुलन्सवरील लुकलुकरणाऱ्या जांभळ्या काचामधील लाल दिवा लावण्याची तरतूद वगळण्यात आली आहे. आपत्कालीन किंवा आणीबाणी व्यवस्थापनासाठी विशिष्ट प्रकारची रचना केलेल्या वाहनांवर केंद्र शासन विनिर्दिष्ट केलेल्या वाहनांवर बहुरंगी लाल, निळा आणि पांढरा रंगाचा दिवा लावण्यास परवानगी आहे. केंद्र शासन अधिसूचनेनूसार केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 108 मधील पोट नियम (4) मधील तरतूदीचा वापर करुन कार्यालयीन कर्तव्यार्थ असणाऱ्या आपत्कालीन आणि आणीबाणीच्या व्यवस्थापनाच्या कर्तव्यार्थ वापरण्यात येणाऱ्या खालील नमूद वाहनांच्या टपावर बहुरंगी लाल, निळा आणि पांढरा रंगाचा दिवा वापरण्यास विनिर्दिष्ट केले आहे. अ)अग्निशमनाशी संबंधित कर्तव्ये. ब) पोलिस, लष्करी दले किंवा निमलष्करी दलांची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्यावर असणारी वाहने. क) नैसर्गिक आपत्ती जेसे की, भुकंप, पुर, भूस्खलन, वादळ, त्सुनामी आणि मानवनिर्मित आपत्ती जसे की, आण्विक आपत्ती, रासायनिक आपत्ती आणि जैविक आपत्ती इत्यादीच्या निवारणासाठी कर्तव्यार्थ असणारी वाहने, तथापि जर वाहन विनिर्दिष्ट कर्तव्यार्थ वापरासाठी नसेल तर बहुरंगी दिव्याचा वापर करता येणार नाही.

            दरवर्षी राज्य शासनाने परिवहन विभाग किंवा केद्रशासित प्रदेशाचे प्रशासन यथास्थिती उपरोक्त 3 अ व 3 ब मध्ये नमूद वाहनांच्या बाबत जनतेच्या माहितीकरीता त्या प्राधिकाऱ्यांना दिवा लावण्यास परवानगी दिली त्यांची यादी प्रसिध्द करतील अशी तरतूद विहीत केली आहे. परिवहन विभागामार्फत या वाहनांच्या विंड स्क्रीनवर लावण्यासाठी एक स्टिकर जारी करण्यात येणार आहे. हे स्टिकर विनिर्दिष्ट अधिकाऱ्यास एकावेळी एकाच विनिर्दिष्ट वाहनाकरीता जारी करण्यात येणार आहे.

            केंद्रीय मोटार वाहन नियम,1989 च्या नियम 108 मधील सुधारणा व अधिसुचनेचा विचार करता आपल्या विभागातील अधिकाऱ्यांच्या वाहनांवरील लाल, अंबर दिवे व ॲम्बुलन्सवरील दिवे काढून टाकण्यासाठी आवश्यक त्या सूचना जारी कराव्यात. तसेच या सुचनेनूसार ज्या वाहनांवर बहुरंगी लाल, निळा आणि पांढरा रंगाचा दिवा लावण्यास अनुज्ञेय आहे त्या वाहनांवर तशा प्रकारचे दिवे लावण्याबाबत उचित कार्यवाही करावी. अशी विनंती केली असल्याबाबत  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी  यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: