Maharshtra News Nanded News

 पाणी…

 

पाणी वाचविण्यासाठी युवा पिढींनी पुढाकार घ्यावा

                                                        जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड, (जिमाका) दि. 8:- पाण्याचा एक-एक थेंब महत्वाचा असून पाणी वाचविणे ही काळाची गरज आहे. पाणी व्यर्थ वाया जाऊ न देता पाण्याचा योग्य वापर करावा. पाणी वाचविण्यासाठी युवा पिढींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. 

जलसंधारण मंत्रालय आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात 700 जिल्ह्यामध्ये कॅच द रेन ( पावसाचे पाणी साठवा) ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील 100 गावाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील गावाचाही समावेश आहे. या मोहिमेंतर्गत गावातील किमान 100 कुटूंबाना छतावर पडणारे, शेतात पडणारे तसेच गावाच्या परिसरात पडणारे पावसाचे पाणी साठवण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी , चंदा रावळकर  यांनी दिली. 

नेहरू युवा केंद्राच्यावतीने युवा कार्यक्रम व सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला जिल्हास्तरीय कॅच द रेन अभियानाचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी कॅच द रेनच्या लोगोचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, वन विभाग, सिंचन विभाग एनजीओ व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक आदी उपस्थित होते.

0000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: