
कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न
परभणी, दि. 8 :-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी व विधी साक्षरता मंडळ, बालविद्या मंदीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नानलपेठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबीर दि.4 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 9 वाजता बाल विद्या मंदीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संपन्न झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून लेखक व ग्रामीण कथाकार दशरथराव गहाळ, परिवहन कार्यालयाचे अभिजित वाघमारे, कला शिक्षक केशव लगड, प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण कुलकर्णी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एफ.के.शेख आदिंची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पॅनल विधीज्ञ ॲड जीवन पेडगावकर यांनी केले. तर सुत्रसंचालन प्रविण सोनोने यांनी करुन आभार प्रा.श्रीधर खुपसे यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थींनी, शिक्षक व प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-*-
