Maharshtra Marathi News Nanded Marathi News

 अपघाताचे…

 

अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी

रस्ते वाहतुक नियमाचे पालन करा

         सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले 

नांदेड, (जिमाका) दि. 8:- रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांनी रस्ते वाहतूक विषयक नियमाचे पालन करावे, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ते सुरक्षा जागृतीपर प्रबोधन कार्यक्रम कंधार येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे संपन्न झाला. यावेळी रस्ते अपघातांची कारणे व ते टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शनात ते बोलत होते. 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 32 व्या रस्ते सुरक्षा अभियान2021 च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात रस्ते वाहतूकविषयक नियमांची माहिती दिली. अपघात प्रसंगी जखमींना मदत करण्याचे आवाहन वाहन निरीक्षक मेघल अनासने यांनी केले. रस्ता सुरक्षेची शपथ मुख्याध्यापक  श्री. अंबटवाड यांनी दिली. यावेळी रस्ते सुरक्षा विषयक माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. शेवटी शाळेच्या परिसरात दुचाकी व सायकलला रिफ्लेक्टर लावण्यात आले. शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. रेणके यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, सतीश जोशी, लक्ष्मण मस्के यांनी परिश्रम घेतले.

0000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: