Maharshtra Marathi News Nanded Marathi News

 सुदृढ…

 

सुदृढ नागरिकांनी नियमितपणे रक्तदान करावे

         प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेशकामत

नांदेड (जिमाका) दि. 2 :- कोवीड-19 प्रादुर्भावमुळे वैद्यकीय यंत्रणेला रक्ताचा तुटवडाजाणवत असल्याने सामाजिक भानठेवून सुदृढ नागरिकांनी नियमितपणेरक्तदान करावे, असे आवाहन प्रादेशिकपरिवहन अधिकारी शैलेश कामतयांनी केले. “32 रस्तासुरक्षा अभियान 2021″ निमित्तानेनांदेड प्रादेशिकपरिवहन कार्यालय येथे अपघाताच्यावेळी करावयाच्या प्रथमोपचाराचे प्रात्याक्षिक मार्गदर्शन शिबीराचे आज आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. 

रस्ते अपघात त्याद्वारेहोणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमीकरण्याच्याहेतूने “32 रस्ता सुरक्षाअभियान 2021″ नांदेड  जिल्हयातील 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी2021 या कालावधीत राबविण्यात येतआहे. रस्ते वाहतुक नियमांविषयीनागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रादेशिकपरिवहन कार्यालय नांदेड यांच्यावतीनेविविध उपक्रम राबविले जातआहेत. यानिमित्तआयोजित चित्रकला निबंधस्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी, नागरिकांनी सहभाग घ्यावा, असेआवाहन उपप्रादेशिक परिवहनअधिकारी अविनाश राऊत यांनीयावेळी केले. 

या आरोग्यतपासणी शिबीराकार्यालयात आलेल्याअर्जदारांची तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी, रक्तदाब, मधूमेह एचआयव्हीतपासणी करण्यात आली. रक्तदानशिबीरासाठी डॉ. शंकरराव चव्हाणवैद्यकीय महाविद्यालय नांदेडयेथील डॉ. पुजा नागरगोजे, डॉ. निशा गवरवार, डॉ. शरदअवचार,डॉ. भोंग, श्री. भालेरावयांच्या वैद्यकीय पथकाने सहभागघेतला. श्री गुरुगोबिंदसिंसामान्यरुग्णालयाच्या डॉ. उमेश मुंडे, डॉ.शिंदे, श्रीमती शिल्पा सोनाळे, श्री. सुवर्णकारयांनी आरोग्य तपासणी केली.तसेच श्री. शेख यांनीनेत्र तपासणीसाठी सहकार्य केले.सहभागी नागरिकांच्या एचआयव्हीतपासणीसाठी डॉ. कुलदीप अंकुशे, डॉ. पंडागळे, श्री. र्यवंशी यांनीपरिश्रम घेतले. 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीसहा. प्रादेशिक परिवहन अधिकारीअनंत भोसले, राहूल जाधव, मोटारवाहन निरीक्षक पद्माकर भालेकर, मोल आव्हाड, मुख्य लिपीकराजेश गाजूलवाड, वरिष्ठ लिपीकश्रीमती जयश्री वाघमारे, नंदकिशोर कुंडगीर प्रदिप बिदरकर यांच्यासह नांदेडयेथील मोटार ड्रायव्हींग स्कूलसंचालक यांनी परिश्रम घेतले.

0000


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: