Maharshtra Marathi News Nanded Marathi News

 “न्याय…

 

न्याय आपल्या दारी संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यात

फिरते लोकअदालत, कायदेविषयक शिबीराचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 3 :- ‘‘न्याय आपल्या दारी’’ या संकल्पनेतून सुरू केलेल्या फिरते लोकअदालत व कायदेविषयक शिबीरासाठी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथून आलेल्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन सोमवार 8 फेब्रुवारीला प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एस. आर. जगताप यांच्या हस्ते जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे सकाळी 10.30 वा.करण्यात येणार आहे.  

समाजातील अगदी तळागाळातील लोकांना न्याय मिळावा हे उद्दीष्ट डोळयासमोर ठेवून मा. सर्वोच्च न्यायालय, नवीदिल्ली यांच्या ‘‘न्याय आपल्या दारी’’ या संकल्पनेतून सुरू केलेल्या फिरते लोकअदालत व कायदेविषयक शिबीराचे आयोजन राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हयातीत काही तालुक्यांच्या निवड गावात 8 ते 23फेब्रुवारी 2021 या कालावधीत करण्यात आले आहे. 

न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच बॅंकांचे, विमाकंपनी, विद्युत महामंडळ, बीएसएनएल, व इतर दिवाणी दाखलपुर्व प्रकरणे या  लोकअदालतीत नियोजीत गावात फिरुन तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यात कायदेविषयक शिबीराद्वारे जनजागृती केली जाणार आहे. लोकअदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश सौ. कमल वडगावकर यांची नियुक्ती केली आहे. हे फिरते लोकअदालत यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करुन या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी केले आहे.

000000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: