Maharshtra News Parbhani News

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चार शाळाची निवड

 

 

    परभणी,  दि.3 :-  महाराष्ट शासनाच्या, ग्राम विकास विभागाचे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ) अंतर्गत राज्यातील १०० आदर्श शाळांच्या निवडीसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा अभियान परिषदेद्वारे जिल्ह्यातील चार शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांना भेटी देऊन, आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज दिले. 

पालम तालुक्यातील तीन शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुयनी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाव्हा व गंगाखेड तालुक्यातील डोंगरजवळा जिल्हा परिषद शाळेचा समावेश करण्यात आला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शाळांचा भौतिक कायापालट, शाळा समितिचे बळकटीकरण व शाळामध्ये आनंददायी शिक्षण होण्यासाठी हा कार्यक्रम खूप सुंदरपने राबविण्यात यावा. पर्यावरण स्नेही वातावरण निर्माण होण्यासाठी एक मुल एक झाड हि संकल्पना राबवावी व या कार्यक्रमाला सांगड म्हणून मानव विकास मिशन अंतर्गत संबंधित शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी सायकल चे वाटप करण्याचेहि निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

 मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी संबंधित शाळांना संरक्षण भिंती, विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी परसबाग निर्माण करणे,शौचालयाची दुरुस्ती व शाळेच्या विद्यार्थ्यांना पीन्याच्या पाण्यासाठी RO, कंपोस्ट पिट याबाबत  निर्देश दिले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी जि प (पं) श्री यादव व शिक्षणाधिकारी श्रीमती पाटेकर यांना तालुक्यातील निवड झालेल्या शाळांना भेटी देऊन निकष पूर्ण केल्याची तपासणी करावी  आणि तसा अहवाल सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी बैठकीत दिले. निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना ३ जानेवारी २०२२ रोजी सावित्रीबाई फुले जयंतीला आदर्श शाळा पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उप मुख्यकार्यकारी जि.प.(पं) ओमप्रकाश यादव, शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर, गट शिक्षण अधिकारी पालम ढवळे, गंगाखेड विस्तार अधिकारी भालेराव, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा समन्वयक योगेश जाधव, तालुका समन्वयक अमरदीप वाकळे, शिवराज शिंदे, हनुमंत हिंगारूपे आदि उपस्थित होते. 

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: