Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

महात्मा गांधी यांना अभिवादन; हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन

 

            परभणी, दि.30 :- जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात  त्यांच्या  प्रतिमेस जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहून हा दिवस ‘हुतात्मा दिन’ म्हणून पाळण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर,  प्रवीण कोकांडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
                             -*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: