Maharshtra Marathi News Nanded Marathi News

 मराठवाडा…

 

मराठवाडा विभागाच्या माहिती जनसंपर्क कार्यालयातील

बारा कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीचाहोणार गौरव 

          औरंगाबाद, दि. 28, (विमाका) – सन2020 या वर्षात आपल्या वैशिष्टयपूर्ण कामाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक (माहिती) कार्यालय, मराठवाडा विभाग, औरंगाबाद  अंतर्गत  कार्यालयांतील बारा कर्मचाऱ्यांची  उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली आहे.  संचालक (माहिती) गणेश रामदासी यांनी  नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. तसेच स्वच्छ व सुंदर कार्यालय म्हणून संपूर्ण मराठवाड्यातून  जालना येथील जिल्हा माहिती कार्यालयाची निवड करण्यात आली आहे. उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच कार्यसंस्कृती  प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

मराठवाडा विभाग अंतर्गत माहिती व जनसंपर्क विभागाचे  एकूण दहा कार्यालयं आहेत.  या कार्यालयांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या प्रसिध्दीचे काम अव्याहतपणे सुरु असते.  गेल्या वर्षभरात आपल्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडण्याबरोबरच इतर कामातही हिरीरीने सहभाग घेऊन उत्तम काम करणाऱ्या तसेच कोरोनासारख्या आपत्कालिन परिस्थितीत तसेच निवडणुकीच्या कालावधीत उत्तम कार्य करणाऱ्या आणि अचानक आलेल्या कामाची जबाबदारी स्वीकारुन कार्यालयाची प्रतिमा उंचावणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा  उत्कृष्ट कर्मचाऱ्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

वर्ष 2020 साठीच्या उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

उत्कृष्ट शिपाई म्हणून प्रतिभा इंगळे, जिल्हा माहिती कार्यालय, जालना व अशोक बोर्डे, जिल्हा माहिती कार्यालय, लातूर, उत्कृष्ट वाहनचालक म्हणून  सुभाष पवार, जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद व रामकिसन तोकले विभागीय माहिती कार्यालय, लातूर, उत्कृष्ट छायाचित्रकार/छायाचित्रणकार म्हणून ना.गो.पुठ्ठेवाड, पर्यवेक्षक, जिल्हा माहिती कार्यालय, बीड, व विजय होकर्णे, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड, उत्कृष्ट लिपिक म्हणून शिवाजी गमे, दुरमुद्रण चालक जिल्हा माहिती कार्यालय, बीड, मनिषा कुरूलकर, विभागीय माहिती कार्यालय, लातूर, प्रसिध्दी कामाकाजासाठी  अमोल महाजन, माहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, जालना व अश्रूबा सोनवणे, जिल्हा माहिती कार्यालय, लातूर  वर्गदोनचे उत्कृष्ट अधिकारी म्हणून मीरा ढास, सहायक संचालक, विभागीय माहिती कार्यालय, लातूर तर वर्गएकचे उत्कृष्ट अधिकार म्हणून मुकूंद चिलवंत, जिल्हा माहिती अधिकारी, औरंगाबाद यांची निवड करण्यात आली.

***

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: