Maharshtra News Parbhani News

गावकऱ्यांच्या एकतेतूनच आदर्श गाव निर्माण होतात – पालकमंत्री नवाब मलिक

 

 

      परभणी, दि.26 :-    सोन्ना गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते संपन्न झाला. गावकऱ्यांच्या एकतेतूनच आदर्श गांव निर्माण होतात असे प्रतिपादन अल्पसंख्याक विकास व औकाफ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री तथा पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले.  

            या कार्यक्रमास आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी दी. म. मुगळीकर, पोलीस अधीक्षक जयंत मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, तहसिलदार डॉ. संजय बिरादार, नायब तहसिलदार रामदास  कोलगणे, जिल्हा परिषद सदस्य गोविंद देशमुख, किरण सोनटक्के यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.

            यावेळी बोलतांना पालकमंत्री नवाब मलिक म्हणाले की, गावकऱ्यांनी गावात एकोपा ठेवल्यास आदर्श गाव निर्माण होतात. सोन्ना गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे येथील सर्व ग्रामस्थाचे व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन करुन माझे गाव सुंदर गाव यामध्ये सहभागी होवून गांव स्वच्छ व सुदर बनवावे तसेच गाव हगणदारी मुक्त करण्याबाबत पुढाकार घ्यावा या कामाध्ये आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू तसेच प्रशासन ही आपणास सहकार्य करेल असे आश्वासित केले. गावातील युवक तरुणांनी ठरविल्यास गावाचा विकास होवून गावाच कायापालट होईल. ग्रामपंचायतीना थेट निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे गावाच्या विकासात नक्कीच भर पडेल तसेच या गावचा जलजीवन मिशन योजनेमध्ये समावेश झाला आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी उत्तम काम करुन गावाचा विकास करावा असे त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार कार्यक्रमानंतर पालकमंत्री नवाब मलिक यांनी वृक्षारोपन केले.  

            आमदार सुरेश वरपुडकर यांनी सोन्ना गावात विविध विकासात्मक उपक्रम होतात तसेच या गावामध्ये लोकसहभागामधून पानदन रस्त्याचे अनेक कामे झाली आहेत असे सांगून सोन्ना गावाच्या विकासाच्या दृष्टीने प्रलंबित कामाची व नविन प्रस्तावित कामाची माहिती करुन देवून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे व गावकऱ्यांचे अभिनंदन केले.

            प्रारंभी डॉ. शाम गमे यांनी गावाच्या समस्या व भविष्यात करावयाच्या कामाची माहिती प्रास्ताविकातून सादर केली. या कार्यक्रमास नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुभाषराव गमे, सुधाकर कोंडरे, गणेश टोगराज, गजानन गमे, तारामती दंडवते, लक्ष्मीबाई गादेवाड, सुवर्णमाला सुर्यवंशी, सिमा कदम, संजीवनी देशमुख, ग्रामसेवक ए. बी. दुधाटे तसेच मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

-*-*-*- *-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: