Maharshtra News Nanded News

 महात्मा…

 महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती

योजनेंतर्गत आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यातील कर्जमुक्तीस पात्र 11 हजार 500 शेतकऱ्याची सातवी यादी 1 जानेवारी2021 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्धकरण्यात आली आहे. त्यापैकी 9 हजार 176 शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आधारप्रमाणिकरण केले नाही. आधार प्रमाणिकरणकेल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यातशासनामार्फत कर्जमुक्तीची रक्कमजमा होणार नाही. आधार प्रमाणिकरणशिल्लक शेतकऱ्यांनी जवळच्यासेतू केंद्रावर जाऊन तात्काळआधार प्रमाणिकरण करण्याबाबत ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारीजिल्हास्तरीय तालुकास्तरीय समितीकडेवर्ग करण्यात आल्या आहेतअशा शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन तक्रार निकाली काढून घ्यावी, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधकडॉ. अमोल यादव यांनी केलेआहे. 

थकबाकीदार शेतकऱ्यांनादिलासा देण्यासाठी शासनानेमहात्मा जोतीरावफुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2019″ ही 27 डिसेंबर 2019 च्या शासननिर्णयाद्वारे कार्यन्वित केली आहे. यात 1 एप्रिल, 2015 ते 31 मार्च, 2019 पर्यंतच्या कालावधीसाठीअल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्यातसेच या कालावधीत घेतलेल्याअल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुर्नगठन / फेरपुनर्गठनकेलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर, 2019 रोजी 2 लाखापर्यंत थकीतअसणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीयोजनेचा लाभ देण्यात येणारआहे. 

नांदेड जिल्ह्यातया योजनेंतर्गतएकूण 2 लाख 14 हजार 491 शेतकरीकर्जमुक्तीसाठी पात्र असुन त्यापैकीबँकांनी 2 लाख 7 हजार 146 शेतकऱ्याचीमाहिती पोर्टलवर अपलोड केलीआहे. या बँकांनी अपलोड केलेल्यामाहिती पैकी शासनाने कर्जमाफीपात्र असणाऱ्या 1 लाख 94 हजार 324 शेतकऱ्यांची यादीपोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलीआहे. त्यापैकी 1 लाख 85 हजार 148 शेतकऱ्यांनीआधार प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्णकेलेली आहे. आधार प्रमाणिकरणप्रक्रिया पुर्ण केलेल्या शेतकऱ्यापैकी 1 लाख 79 हजार 628 शेतकऱ्यांच्या खात्यातकर्जमाफीची रक्कम 1229.22 कोटीजमा करण्यात आले आहेत. उर्वरीतआधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्याच्याखात्यात शासनामार्फत लवकरचकर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यातयेणार आहे. 

ज्या शेतकऱ्यांच्यातक्रारी जिल्हास्तरीय समिती तालुकास्तरीय समितीकडे वर्ग करण्यातआलेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांनीतात्काळ आपल्या तालुक्यातील सहायकनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्कसाधून आवश्यक त्या कागदपत्राचीपुर्तता करुन तक्रार निकालीकाढून घ्यावी, असेही आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. अमोल यादव यांनी केले आहे.

00000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: