Nanded Marathi News

नांदेड जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा, अन्यथा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करु : प्रविण साले

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात मागील काही दिवसापासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून मटका, गुटखा आदी अवैध धंदे जोमात सुरु आहेत. हे सर्व अवैध धंदे बंद करुन गुन्हेगारीवर आळा घालावा अन्यथा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी दिला आहे. तसेच या मागणीच्या संबंधीने उद्या दि. 25 जानेवारी रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांची भेट घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात गुटखा बंदी असतांनाही जिल्ह्यात मात्र गुटख्याची खुले आम विक्री सुरु असून मराठवाड्यात सर्वत्र गुटख्याचे वितरण होत आहे. त्याच बरोबर शहरासह तालुक्यात गल्लहबोळात मटका अड्डे सुरु असून यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. एवढेच नव्हे तर बलात्कार, दिवसा ढवळ्या महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याच्या गंभीर घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून पोलीस प्रशासन करतंय काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालून अवैध धंदे बंद करावेत या मागणीचे निवेदन उद्या विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांना देण्यात येणार आहे. तसेच येत्या 15 दिवसात जिल्ह्यातील अवैध धंदे बंद न झाल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी दिली.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: