
परभणी, दि. 22 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या . जिल्हा कार्यालय परभणी करिता सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेअंतर्गत 400 लाभार्थी उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. वरील योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. मातंग समाजात अंर्तभाव असणाऱ्या 12 पोट जातीतील अर्जदारांकडून विविध व्यवसायाठी कर्जप्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तरी परभणी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मांग, मातंग समाजातील बेरोजगार युवक- युवतीनी तसेच इच्छुकांनी या महामंडळाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सि.के.साठे यांनी केले आहे.
मातंग समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी या पुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करून त्रयस्थ, मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. कर्जप्रस्तावासोबत जातीचा दाखला , अर्जदारांच्या कुंटूबांच्या उत्पन्नचा दाखला, नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट फोटोच्या दोन प्रती, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, रॅशनकार्ड झेरॉक्स प्रती, आधारकार्ड / मतदान कार्ड / पॅनकार्ड झेरॉक्स प्रती , व्यवसायाचे दर पत्रक, व्यवसाय ज्या जागेवर करावयाचा आहे त्या जागेची भाडे पावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा ( नमुना नंबर 8 ) लाईट बील व टॅक्स पावती . तसेच अनुभवाचा दाखला वरील प्रमाणे कागदपत्रे स्वयंसाक्षाकित करून घोषणापत्र देण्यात यावे. वरील योजनांचा कर्जप्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यातील झेरॉक्स, हस्तलिखीत अथवा टंकलिखीत केलेले अर्ज दि. 5 फेब्रुवारी 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हा कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड, परभणी या ठिकाणी स्विकारले जातील. असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या, परभणी कळविले आहे.
-*-*-*-*-
