Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेबाबत प्रशासनाचे आवाहन

 

 

            परभणी, दि. 22 :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये एन.पी.ए.झालेल्या खात्यावर शासनाकडुन कर्जमुक्तीची पूर्ण रक्कम येणार नसून उर्वरित रक्कम संबंधित बॅकांनी सोसायची आहे.अशा खात्याबाबत शेतकऱ्यांकडुन कसलीही रक्कम बँकांनी भरुन घ्यावयाची नाही . तसेच पुनर्गठण व फेरपुनर्गठण असलेल्या कर्जाची संपूर्ण रक्कम माफ होणार नसून सप्टेंबर , 2019 वरील थकीत हप्त्याची रक्कम माफ होणार आहे . तसेच ज्या ज्या वेळेस कर्जमुक्तीच्या यादीत नाव येईल त्या त्या वेळेस आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे . तसेच शासन निर्णयानुसार जे खातेदार या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र नाहीत त्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करुन घ्यावे.असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे.

            महाराष्ट्र शासनाचे सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभागाचे शासन निर्णय दिनांक 27 डिसेंबर , 2019 नुसार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेची अमंलबजावणी सुरु करण्यात आली आहे . सदर योजनेच्या अनुषंगाने आज पर्यंत शासनामार्फत सदर योजनेच्या पोर्टलवर लाभार्थ्यांच्या एकूण ( 7 ) याद्या प्रसिध्द झालेल्या आहेत . सदरच्या याद्या बँक शाखा , सी.एस.सी.सेंटर / आपले सरकार सेवा केंद्र, सहाय्यक निबंधक सहकरी संस्था यांचे कार्यालयासत शेतकऱ्यांना पाहण्यास मिळतील.  प्रसिध्द झालेल्या लाभार्थ्यांपैकी दिनांक 21 जानेवारी 2021 अखेर 1,82,714 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झालेले असून पैकी 1,78,155 लाभार्थ्यांच्या खात्यात 1,111.21 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत . महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस पात्र ठरुनही आधार प्रमाणीकरण केले नसल्याने जिल्ह्यातील 8,223 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही . सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे . यादीमध्ये नाव असलेल्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी कुठलाही विलंब न लावता येत्या तीन दिवसात जवळचे आपले सरकार केंद्र , सी.एस.सी.सेन्टर किंवा बॅक शाखेत जावून आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे . जेणे करुन आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना संबंधित बँकांमार्फत सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करणे शक्य होईल . या योजनेच्या मुख्य उद्देशानूसार योजनेत संपूर्ण कर्जमुक्त झालेले शेतकरी सन 2020-21 या हंगामामध्ये पीक कर्ज घेण्यासाठीही पात्र ठरणार आहेत . तरी यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी योजना संपण्यापूर्वी विनाविलंब आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करुन घ्यावे . आधार प्रमाणीकरण न केल्यास कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही व सदरची रक्कम बॅकेडुन व्याजासहीत संबंधिताकडुन वसूल केली जावू शकते . पात्र लाभार्थ्यांच्या यादीतील ज्या शेतकऱ्यांनी बोटांचे ठसे व मोबाईल OTP द्वारे देखील न झाल्यामुळे आधार प्रमाणिकरण शक्य नाही ( Unable to E – KYC ) हा पर्याय निवडून तक्रार केली असेल , अशा शेतकऱ्यांनी आपले आधार कार्डची स्व: साक्षांकित छायाप्रत , तक्रार नोंदणीच्या पावती व बॅकेचे पासबुकाचे पहिल्या पानाचे छायांकित प्रतीसह संबंधित तहसिल कार्यालय अथवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयास संपर्क साधून आपले तक्रार निवारण संबंधित तालुकास्तरीय समितीकडुन करुन घ्यावे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करतेवेळेस आधार क्रमांक चुकिचा असल्यामुळे आधार क्रमांक अमान्य अशी तक्रार नोंदविलेली असेल तर त्यांनी आपले आधार कार्डची स्व – साक्षांकित छायाप्रत , तक्रार नोंदणीच्या पावती व बॅकेचे पासबुकाचे पहिल्या पानाचे छायांकित प्रतीसह संबंधित बॅक शाखेत / गटसचिव यांचेकडे किंवा संबंधित सहायक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयात जमा करावी . कारण शेतकऱ्यांनी नोंदविलेली तक्रार निकाली निघाल्या शिवाय कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही . त्याच प्रमाणे कर्जमुक्तीच्या यादीत मयत खातेदाराचे नाव आले असल्यास मयत खातेदारांच्या नातेवाईक अथवा कायदेशिर वारसाने आधार प्रमाणीकरण न करता प्रथम कायदेशिर वारसाने त्याची संपूर्ण माहिती तात्काळ संबंधित बँक शाखेस पुरवावी व बॅकेच्या नियमाप्रमाणे वारस लावण्याची प्रक्रिया पूर्ण करुन वारसाची नोंद कर्ज खात्यास करुन घ्यावी . मयत खातेदारांच्या वारसाने विहीत मुदतीतच कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक आहे . संबंधीत बँकांनी त्यांचे स्तरावर देखील वारस लावून घेण्याच्या बाबतीत व विहीत मुदतीत दुरुस्त केलेली माहिती पोर्टलवर अपलोड करण्याच्या बाबतीत विहीत मुदतीत कार्यवाही करणे आवश्यक आहे . तसेच सर्व बँकांनी पोर्टलवर ऑनलाईन प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विहीत नमूण्यातील अहवाल व आधार कार्डच्या छायांकित प्रतीसह संबंधित सहायक निबंधक, जिल्हा उपनिबंधक यांचे कार्यालयास येत्या दोन दिवसात सादर करावेत. असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, परभणी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: