
परभणी, दि. 22 :- राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. 24 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता परभणी येथे आगमन व शासकीय विश्रामगृह सावली येथे राखीव. सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय परभणी येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी, दुपारी 1 ते 2 दरम्यान राखीव. दुपारी 2 वाजता पालकमंत्री हे जिल्हाधिकारी कार्यालयात जनतेचे निवेदन स्विकारतील. सायंकाळी 4 वाजता जल जीवन समितीची बैठक, सायंकाळी 4.30 वाजता जिल्हा खनिज प्रतिष्ठाणची बैठक, सायंकाळी 5 वाजता माजी महापौर प्रताप देशमुख यांच्या निवासस्थानी चहापान, सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत राखीव. रात्री 8 वाजता जाकीर अहेमद खान मोईन खान यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन व सोईनुसार मुक्काम करतील.
सोमवार दि.25 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 9.30 वाजता राखीव. सकाळी 10 वाजता जिल्हा वार्षिक योजना बैठक, दुपारी 3 वाजता परभणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस भेट, सायंकाळी 4 वाजता राहत कॉ.ऑप क्रे सोसा. परभणी येथे भेट, सायंकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान शासकीय विश्रामगृहात राखीव. सायंकाळी 7 वाजता उदघाटन व दर्पण निमित्त सदभावना संमेलन व संता गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थिती. रात्री 8 वाजता आखील इनामदार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन व सोईनूसार मुक्काम करतील.
मंगळवार दि.26 जानेवारी रोजी सकाळी 9.05 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमकडे प्रयाण. सकाळी 9.15 ते 10.40 वाजेदरम्यान प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम परभणी येथे आगमन व ध्वजारोहण व इतर शासकीय कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता परभणी येथून मोटारीने वसमत जि.हिंगोलीकडे प्रयाण करती.
-*-*-*-*-
